जळकोट, दि. २६ : मेघराज किलजे
सध्या देशासह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये जळकोट(ता.तुळजापूर) येथे सामाजिक बांधिलकी जपत सिमेंस गामेसा व सेवावर्धिनी ,पुणे या दोन सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नधान्याचे किट, १०० मास्क, सॅनीटायझर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सिमेंस गमेसाचे साईट इन्चार्ज , सेवावर्धिनीचे मारुती पांचाळ, पुरुषोत्तम बेले, जळकोटचे सतीश माळी व समर्थ क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील उपस्थित होते.