तुळजापुर : कुमार नाईकवाडी

श्री तुळजा भवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत संसर्गजन्य कोरोना साथीच्या वाढत्या पादुर्भाव मुळे महसुल प्रशासन,नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या सयुक्तं विद्यमानाने दि.२२ ते २६ या कालावधीत जनता कर्फ्यु ठेवण्यात आला होता. या पाच दिवसाच्या जनता कर्फ्यु स तुळजापुर शहरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

तुळजापुर शहरातील रस्त्यावर दुपार नंतर सन्नाटा पसरला होता. न.प. मार्फत शहराबाहेर केलेल्या नाकाबंदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात परगावचा व्यक्ती आल्यास चौकशी करुन नोंद करण्यात येत होती. तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी स्वता शहरात फिरुन फेर फटका मारत होते. त्याचबरोबर शहरात पोलीस ही आपली कर्तव्याची भुमीका बजावीत होते. गेल्या  पाच दिवसात  दुध विक्रेते यानी सकाळी ६ ते ९ या वेळेत दुग्ध व्यवसाय करीत होते. तसेच शहरात फक्त हाँस्पीटल जवळील मेडीकल चालु होती.बाकीच्या मेडीकल नी बँका नी व व्यापारी वर्गानी नागरीकांना या जनता कर्फ्यु ला चांगला प्रतिसाद दिला. या बद्दल तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आभार मानले.
 
Top