तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे शहरातील अँटोरिक्षा चालका वर ही उपासमारीची वेळ आली आहे. 

श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदीर संसर्गजन्य कोरोना साथी रोगामुळे गेल्या चार माहिन्यापासुन बंद असल्यामुळे भाविकांची संख्या नसल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे. कांही अँटो रिक्षा चालकांनी बँका कडुन कर्ज काढुन रिक्षा घेतल्याने या कोरोना महामारी च्या जिवनात हप्ते कसे फेडायचे या चिंतेत आहेत. एक तर पेट्रोल चे दर वाढल्याने अँटो रिक्षा परवडत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. 

तिर्थ क्षेत्र  तुळजापुरात श्री देवी दर्शनासाठी भाविकच येत नसल्यामुळे आपल्या कुंटुबाचा गाडा कसा हाकायचा या चिंतेत आहेत. तुळजापुर शहरात सतत लाँकडाऊन पडत असल्याने अँटो रिक्षा चालवायचा कसा असा प्रश्न भेडसावत आहे. तरी राज्य शाषनाने अँटोरिक्षा चालकाना थोडीफार  मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे अँटो रिक्षा चा व्यवसाय थंड पडला आहे. तिर्थ क्षेञ तुळजा भवानी मातेच्या दरबारात श्री देवीच्या कृपेमुळेच आमंच्या संसाराचा गाडा हाकला जातो अशी खंत व्यक्त केली जात आहे.
 
Top