तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यावधी जणाचे आराध्यदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेस नागपचंमी सणाचे औचित्य साधुन दुसऱ्या दिवशी दि.२६ रविवार रोजी गौरी निमित्त श्री तुळजाभवानी मातेस हिरे जडीत शालु परिधान करुन शिव कालीन दागिने घालण्यात आला.
प्रारंभी सकाळी श्री तुळजाभवानी मातेस दुग्धा पंचामृत अभिषेक घालुन श्री देवीजीस वस्ञोअलंकार घालुन नित्योपचार पुजा करवुन दुपारती करण्यात आली. या वेळी पाळीचे मुख्य भोपे पुजारी विशाल सोंजी, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजीबुवा, श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान चे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आदीसह श्री तुळजा भवानी मातेचे पुजारी बांधव सेवेदारी उपस्थित होते.
नागपचंमी सणाच्या दुसऱ्या दिवशी मंगला गौरी सन असल्याने रुढी परंपरेने अनादी काला पासुन श्री देवीजीस मौल्यवान दागिने घालण्याची आजतागायत प्रथा आहे. त्यामुळे मंगला गौरी निम्मीत शिव कालीन दागिने घालण्यात आले होते. माञ संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे गेल्या चार माहिन्यापासुन श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरात श्री देवी भक्तांना प्रवेश बंद आहे. त्यामुळे रविवारी श्री देवी भक्तांनी व शहरातील नागरीकांनी आँनलाईन दर्शनाचा लाभ घेतला.
