ताज्या घडामोडी

       
      
                      
तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत संसर्गजन्य कोरोना साथी च्या वाढत्या पादुर्भाव मुळे महसुल प्रशासन,नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने दि.२२ ते २६ या कालावधीत लावण्यात आलेल्या जनता कर्फ्युला तुळजापुर शहरातील नागरीकांनी दि.२४ शुक्रवार रोजी तिसऱ्या दिवशी ही चांगला प्रतिसाद दिला.

शहरातील सर्वच रस्त्यावर  सन्नाटा पसरला होता. दुपार नंतर पाऊसाची चांगल्या प्रकारे शहरात रिमझिम होत होती. सततधार पाऊसामुळे शहरातील नागरीक आपल्या घरातच बसुन होते. न.प.मार्फत शहरात नागरीकांना अँलहान्स द्वारे आव्हान करण्यात येत होते की नागरीकांनी घरात थांबावे, जेष्ट नागरीकांनी रस्त्यावर येऊ नये, मोटार सायकल स्वारानी डबल सीट फिरु नये, विनाकारण नागरीकांनी रस्त्यावर फिरु नये, असे शहरातील सर्वच भागात पुकारण्यात येत होते.

शुक्रवारी मध्यराञी शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यामुळे पाऊसामुळे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. शहरातील कांही भागात पाऊसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.

सध्या पाऊसाळ्याचे दिवस असल्याने नागरीकांनी आपल्या घरातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, विनाकारण रस्त्यावर फिरु नये, आजाराची लक्षणे असल्यास त्वरीत दवाखान्यात जाऊन उपचार करावे, आपल्या साठी शहरात युवा नेते आनंद कंदले मिञ मंडळाच्या वतीने अँटो रिक्षाची सोय केली आहे,  जनतेतरी शहरातीलनी प्रशासनास सहकार्य करावे, कृपया घरातच राहावे रस्त्यावर विनाकारण फिरु नये, असे तुळजापुर नगरपरिषद चे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी जनतेला आवाहन केले आहे.
 
Top