मुंबई, दि. 11 : सामाजिक कार्यकर्ते व पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी सर्व प्रथम "पञकार संरक्षण समिती" चे राज्य सचिव अनिल चौधरी यांनी मा. राज्यपाल यांना ईमेल व्दारे करून सोशल मिडियावर प्रसारित केल्यानंतर ईतर पञकार संघटना व पञकार जागे झालेत.
राज्यात ग्रामीण व शहरी पञकारांचे वेळोवेळी काम करणारे संपादक तथा संस्थापक अध्यक्ष विनोद पञे यांनी आपल्या १० वर्षाच्या कार्यकाळात पञकार संरक्षण कायद्यासाठी सर्व प्रथम "मुंबई आजाद मैदान" येथे बैठे आंदोलन करून हजारो ग्रामीण व शहरी पञकारांना न्याय दिला. विनोद पञे यांना महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळणे पत्रकार संरक्षण समितीच्या सभासदासह ईतर पञकारांनाही आनंदच ठरणार आहे.
राज्यपाल महोदयांनी विनोद पञे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा आणि सामाजिक, सेवाभावी तसेच राज्यातील इतर पञकार संघानी सुध्दा विनोद पञे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल यांच्याकडे ई-मेल व्दारे केली आहे.
