नळदुर्ग‍, दि. 01 : 

महाराष्ट्राच्या लोककलेचा आधार घेवून वासुदेव आणि पोतराज यांच्या माध्यमातून कोरोनाविषयी नळदुर्ग शहरामध्ये पत्रकार बांधवांनी जनजागृती गीतातून व पथनाट्यातून केली.

सर्वत्र कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला असून नळदुर्ग शहर पत्रकार संघ व अणदूर जय मल्हार पत्रकार संघाच्यावतीने बुधवार दि. 1 जुलै रोजी नळदुर्ग येथे कोरोना  संसर्गजन्य आजाराबाबत प्रबोधनात्मक जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्स, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, यसारखे अनेक उपाय योजना या जनजागृती अभियानांतर्गत वासुदेवाच्या व पोतराजाच्या वेशभूषेत नळदुर्ग शहरात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. बसस्थानक समोरुन रॅलीस सुरुवात झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन शुभारंभ केला. शहरातील मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, किल्ला गेट व मिरवणूक मार्गाने मराठा गल्ली, ब्राम्हण गल्ली, माऊली नगर, महामार्गालगत अमर भाळे यांच्या दुकानासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला.

 वासुदेवाच्या भूमिकेत पत्रकार दयानंद काळुंके व पोतराज किसन भोवाळ यांनी कोरोनाची गाणी व घोषवाक्यांच्या म्हणीतून कोरोना जनजागृती केली. या रॅलीमध्ये नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, पांडुरंग पोळे, लतीफ शेख, दिपक जगदाळे, उत्तम बनजगोळे, इरफान काझी, आयुब शेख, विशाल डुकरे, अरुण लोखंडे, किशोर धुमाळ दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे , अमर भाळे , संजय जाधव,  अणदूर जय मल्हार पत्रकार संघाचे श्रीकांत  अणदूरकर, चंद्रकांत गुडड, संजीव आलुरे, दयानंद काळुंके, सचिन तोग्गी, सचिन गायकवाड, लक्ष्मण दुपारगुडे, राज मुकरे, अशोक अलकुंटे, सिद्राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, संतोष पुदाले, सुनील गव्हाणे, भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, श्रमिक पोतदार यांच्यासह नागरीक सहभागी झाले होते. रॅली दरम्यान शहरात बसवेश्वर चौक येथे औषध विक्रेते प्रसाद गोगावे यांनी तर माऊली नगर येथे श्रमिक पोतदार, गुंडप्पा डुकरे यांनी  रॅलीवर पुष्पवृष्टी केली. रँली दरम्यान औषध विक्रेते गणेश मोरडे यांनी पञकारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
 
Top