तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील धोत्री व शिवाजी नगर तांडा येथे कोरोनाचे रूग्ण आढळुन आल्याने कोरोनोच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि.७ रोजी या  गावास भेट देऊन परीस्थितीची पहाणी केली व नागरीकांना नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या.

      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही होताना दिसत आहे.तुळजापुर तालुक्यातील धोत्री व शिवाजी नगर तांडा या गावामध्ये कोरोनाचे रूग्ण आढळुन आल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.या कोरोनोच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि.७ रोजी तालुक्यातील धोत्री व शिवाजी नगर तांडा परीसराला भेट देऊन पहाणी केली व परीस्थितीचा आढावा घेतला.यावेळी त्यानी कोरीनाबाधित रूग्णांचा भेदभाव न करता रूग्णांना मुळ प्रवाहात येण्यासाठी मानसिक आधार द्या असे आवाहन करून गावातील प्रत्येक नागरीकांना मास्क व सॅनिटाइजरचे वाटप करून गावामध्ये जंतुनाशक औषधाची फवारणी करून घेण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या. आरोग्य,पोलिस,महसुल अधिकारी यानी सतर्क रहावे व ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही यावेळी  खा.ओमराजे निंबाळकर यांनी केले.

      यावेळी तुळजापुरचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड,सपोनि नितीन मिरकर, सरपंच ,ग्रामसेवक,तलाठी, पोलिस पाटील,गणप्रमुख दत्तात्रय गवळी,मिडीया विभाग प्रमुख कृष्णा घोटकर,देवकुरूळी शाखा प्रमुख सौदागर जाधव,कृष्णा करंडे,आशा कार्यकर्त्या, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top