ताज्या घडामोडी

    

तुळजापुर : कुमार नाईकवाडी                                                 
पेट्रोल व डिझेल ची अन्याय कारक झालेली दरवाढ रद्द करण्यात यावी अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने दि.७ मंगळवार रोजी तुळजापुर येथील तहसीलदार यांना देण्यात आले.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, सध्या संपुर्ण जगभरात कोवीड १९ (कोरोना) या संसर्गजन्य रोगाने प्रचंड प्रमाणात थैमान घातले आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थकारणावर व लोकांच्या उत्पन्नावर झाला आहे. परिणामी संपुर्ण देशातील जनता अर्थ कारणामुळे हैराण झाली आहे. सध्याची पेट्रोल,डिझेल दरवाढ ही लोकांना न परवडणारी आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीचे परिणाम तमाम जनतेला भोगावे लागत आहे.डिझेलच्या प्रचंड दरवाढीमुळे व्यवसायिक ञस्त झाले आहेत. वाहतुक महाग होऊन महागाई वाढत चाललेली आहे. जनतेच्या प्रश्ना कडे केंद्र सरकार ने गांभीर्याने विचार करुन तरी केंद्र सरकारने केलेली दरवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 या निवेदनावर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष अमर मगर, नगरसेवक रणजीत इंगळे, सुनील रोचकरी, साहेबराव जाधव, बालाजी बंडगर, शिवाजी गायकवाड, आनिल हंगरगेकर, सुधाकर सगट, लखन पेंदे आदीसह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top