जळकोट : मेघराज किलजे
जागतिक डॉक्टर्स डे निमित्त आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांना २४ तास सेवा देणारे पृथ्वीवरचे दैवत म्हणजे डॉक्टर्स यांना लोकमंगल मल्टीस्टेट, जळकोट शाखेच्यावतीने जळकोट येथील संजीवनी क्लिनिकचे डॉक्टर कदम एस डी,व चैतन्य क्लिनिकचे डॉ. शिंदे अमोल व मोजगे क्लिनिकचे .डॉ मोजगे एम.एस व नेहा क्लीनीक चे डॉ.गायकवाड व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट येथील डॉ. एडके यांना पुष्पगुच्छ व शुभेच्छा पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जळकोट येथील लोकमंगल मल्टीस्टेटचे कुलकर्णी, रमेश कलशेट्टी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.