तुळजापुर : कुमार नाईकवाडी
श्री तुळजाभवानी मंदिरा मधील एक सुरक्षारक्षक रमेश वाळवे रा. भंडारी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवाशी असून अत्यंत गरीब कुटुंब आहे. परंतु त्यांचा ऐक महिन्यापूर्वी दुर्दैवाने अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळल्याने ते कुंटुब उघड्यावर पडले असताना. मयत रमेश वाळवे यांचे संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यावरच अवलंबून होते. घरामध्ये त्यांचे वडील आजारी असतात. त्यांच्या आई उदरनिर्वाहासाठी शेतात कामाला जाते त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ ,त्यांच्या पत्नी व दोन लहान मुले 2 वर्ष व 4 वर्ष असा परिवार आहे.मयत रमेश वाळवे गेल्या अनेक वर्षांपासून ते तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता वाळवे हा गेल्या एक महिन्यापासून ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणाहुन एकही रुपयाची मदत मिळाली नाही.त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणारे सर्व सुरक्षारक्षक व स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी मिळून या कोरोना महामारी च्या काळात देखील माणसातील माणुसकीअजुन जिवंत आहे हे दाखवुन देवुन सध्या प्रत्येकाच्या घरात आर्थिक अडचण असताना प्रत्येकाने मदतीचा हात दिला व त्या सर्वांच्या मदतीने मयत रमेश वाळवे याच्या कुंटुबास राष्ट्रीय श्रमीक आघाडी सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी यांच्या वतीने दि.१ जुलै बुधवार रोजी जीवनावश्यक वस्तू धान्य व काही रक्कम त्यांच्या कुटुंबाला देण्यात आली.
यावेळी त्यांच्या आई म्हणाल्या आई जगदंबेने आमच्या मदतीसाठी तुम्हा सर्वांना पाठवले आहे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या. या वेळी राष्ट्रीय श्रमीक आघाडीचे सुरक्षा रक्षक कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.