नळदुर्ग : येथे आषाढी एकादशी निमित्त भाजपाचे नळदुर्ग शहराध्यक्ष पद्माकर घोडके यांच्यावतीने भजनी मंडळ व वारक-याना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, राणा जगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सल्ल्यानुसार भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके यांनी वारकरी व भजनी मंडळ यांच्यासाठी आषाढी एकादशी निमित्त फराळाचे किट पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पञकार विलास येडगे , तानाजी जाधव , शिवाजी नाईक, उत्तम बणजगोळे , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, अमर भाळे, शिक्षक जितेंद्र मोरखंडीकर, दौलतराव मोरे - पाटील, धिमाजी घुगे, गोपाळ देशपांडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, सागर हजारी, कैलास चव्हाण, विशाल डुकरे, किरण धुस्सा आदीसह वारकरी व भजनी मडंळाचे सदस्य उपस्थित होते.