तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे दि.१४ जून रोजी सोलापूर रीटर्न एका रूग्णांचा कोरोना अहवाल हा पाॅझीटीव्ह आला होता.पंधरा दिवसानंतर संबधित रूग्णास उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याने तामलवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे.
तामलवाडी गावामध्ये दि.१४ जून रोजी सोलापूर रिटर्न एका महीलेचा कोरोना अहवाल हा पाॅझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली होती.प्रशासनाच्या वतीने संबधित परीसर संपुर्ण बंद करण्यात आला होता व तसेच तो संपुर्ण परीसर निर्जंतुकीकरण करण्यात आला होता. पाॅझीटीव्ह अहवालानंतर कोरोना रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली होती त्यांचे अहवाल हे निगेटिव्ह आले होते.खा.ओमराजे निंबाळकर यांनी तामलवाडी येथील संबंधित परीसराला भेट दिली व परीस्थितीची पहाणी केली तसेच जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करून अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप केले होते.पंधरा दिवस संबधित रूग्णावर तुळजापुर,उस्मानाबाद येथे उपचार सुरू होते या उपचारानंतर रूग्ण बरा झाल्याने त्याना घरी सोडण्यात आले असुन तामलवाडी गाव अखेर कोरोनामुक्त झाल्याने तामलवाडीसह परीसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
तामलवाडी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायत,आरोग्य अधिकारी, पोलिस,डाॅक्टर,ग्रामविकासअधिकारी,तलाठी,आरोग्य सेविका,आशा कार्यकर्त्या, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,सफाई कामगार, बालाजी अमाईन्स लि. यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.जरी गावामध्ये कोरोनाचा रूग्ण नसला तरीही गावातील सर्व नागरीकानी सतर्क रहावे व प्रत्येकांनी सामाजिक अंतर ठेवुन मास्कचा वापर करावा व अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मीरकर यांनी जनतेला केले आहे.