वागदरी : एस.के.गायकवाड
हिंदु धर्मियांचा पवित्र सण असलेला नागपंचमी हा सण तुळजापूर तालुक्यातील वागदरी व परीसरात कोरोनाच्या सावटाखाली साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सण विशेषता महिलांचा सण म्हणून ओळखला जातो. या सणा दिवसी नाग सापाची नागदेवता म्हणून पूजा केली जाते. नवविवाहित सासरवासी महिला आवर्जून या सणाला गावी माहेरी येतात. लहानपणी एकत्र खेळत बालपणाचा आनंद घेत घेत सासरवासी झालेल्या बालमैत्रिणी या सणा निमित्ताने एकमेकींना भेटून आनंदाने बालपणीच्या आठवणीना उजाळा देत घराच्या समोर ,चौकात झाडाला बांधलेला झोका खेळत ,चौकात गोलरिंगन करून एकमेकींचा हात हातात धरून भुलईची गाणी म्हणत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु या वर्षी कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लाँकडाऊन,संचार बंदी, साथरोग निर्मूलन कायदा जिल्हा बंदी आदी लागू केल्याने या सणाला सासरवासी महिला माहेरी येण्याचे प्रमाण तुरळक दिसून आले. गावात असलेल्या महिलांनाही एकत्र येवून झोका खेळने,गाणी म्हणने वगैरे आनंद म्हणावा तसा आनंद घेता आला नाही. सणाच्या निमित्ताने घरी बनवलेले गोडधोड पदार्थ ,खाऊनच या सणाचा आनंद घ्यावा लागला. एकंदरीत कोरोनाच्या सावटाखाली हा सण साजरा करावा लागला.