उमरगा : लक्ष्मण पवार
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या राज्यातील प्रमुख सामाजिक संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून प्रदेश संपर्क प्रमुख पदी प्रा. गुणवंत जाधवर उमरगा, यांची निवड करण्यात आली आहे.
वंजारी सेवा संघाचे संस्थापक राहुल जाधवर, प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव गीते, महासचिव बाजी दराडे,कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे,उपाध्यक्ष अमोल कुटे, युवा आघाडीचे राज्य प्रमुख प्रकाश आव्हाड, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख डॉ.मंजुषाताई दराडे, राजेंद्र राख,डॉ.श्रीमंत मिसाळ, भाऊसाहेब घुगे, संतोष ताठे, दिलीप ढाकणे, विकास जाधवर , दीपक दराडे, संदीप हुशे ,जालना जिल्हाध्यक्ष, रवीअण्णा मुरकुटे ,यांनी सर्वानुमते ही निवड केली आहे.
राष्ट्रसंत श्री भगवानबाबा,संतश्रेष्ठ श्री वामनभाऊ,संत श्री आवजीनाथ महाराज,लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. मी वंजारी सेवा संघामध्ये मागील दोन वर्षापासून कार्यरत आहे . माझी परत नेमणूक करून पुन्हा एकदा माझ्यावर जबाबदारी दिली.सर्व समाज बांधवानी माझ्यावर सोपलेली जबाबदारी समाजाचे ऋण समजून प्रामाणिक पणे पूर्ण करून संघट्नेचा विचार सामान्या पर्यत पोहचवण्यासाठी प्रामाणिक प्रर्यत्न करु असे प्रा गुणवंत जाधवर यांनी सांगितले.
प्रा. जाधवर यांच्या निवडीबद्दल वंजारी सेवा संघाचे संस्थापक राहुल जाधवर, कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे,उपाध्यक्ष अमोल कुटे, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय मुंडे,प्रदेश कार्याध्यक्ष डॉ नारायण जायभाय,प्रदेश संघटक अशोक घोळवे,विधी सल्लागार ऍड शिवाजी जाधवर तसेच सर्व राज्य, विभागीय कार्यकारिणी व सर्व जिल्हाध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.