उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा तालुक्यात कोरोना रोगाने थैमान घातलेला आहे. तरीही महाराष्ट्र  राज्याबाहेरील व राज्यातील विवीध क्षेत्रातील मान्यवर लोक रात्रीच्या वेळी येऊन मोज मजा करीत आहेत.

उमरगा एमआयडीसी परिसरात दररोज सुंदर व निवांत ठिकाणी मनमुराद नाच गाणे सुरू असल्याचे आज दि. २४ रोजी सकाळी माहिती झाले. नाहीतर  राञीचा नाच दिवसा कळालाच नसता. एका घटनेने हा खेळ पटावर आला. राञीच्या शो बाबत पोलिस व प्रशासनातील महत्वाच्या पदावर असलेले अधिकारी पैसे देऊन स्टेज शो व एमआयडीसी मधील फार्म हाऊस वर डान्स बार चालू करण्यासाठी मुक संमती दिली असल्याची चर्चा सुरू आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रसद पुरविण्यात येत असल्याची कुजबूज सुरू आहे.

 येथे दररोज रात्री परराज्यातील लोक येऊन पैशाची उधळ पटी करतात आणी कोरोना हा महाभयंकर आजार पसरवितात. शहराजवळील एमआयडीसी मधील एका फार्म हाऊस वर कर्मचारी म्हणून काम करणारे दोन मुले समाधान मधुकर मुदगल व विशाल मधुकर मुदगल रा. कोरंगळा ता. औसा जि. लातूर हे दोघे पहाटे शो संपल्यावर त्यांचा घरी जात असताना अपघात (accident) लामजना ( जि. लातूर ) गावाजवळ  झालेला आहे.

जखमींनी लातूर येथील शिवाजी चौक पोलीसांमार्फत औसा पोलीसात इनकँमेरा लेखी तक्रार दिल्याने ही बातमी सर्वदूर पसरली असून यात उमरगा येथील सात जणांनी मिळून राञीचा शो सुरू केल्याची तथा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. ते 2 मुले सह्याद्री हॉस्पिटल लातूर येते ऐडमिट आहेत एक मुलगा ICU मधे ऐडमिट आहे आणि दुसरा मुलगा हात आणि पाय मोडला आहे. दोघेही गरीब कुटुंबातील असल्याने लातूर जिल्ह्यात उस्मानाबाद तथा उमरगा येथील कारनाम्याची चर्चा चवीने सुरू आहे.
 
Top