नळदुर्ग :- अणदूर ता. तुळजापूर या ठिकाणी दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून ते चिंताजनक आहे. रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी नव्याने 18 रुग्णांची भर पडल्याने अणदूर मध्ये कोरोनाबाधितांची संख्या 53 वर पोहचली आहे. तर नळदुर्ग येथे एक रुग्ण आढळला आहे. दरम्यान, अणदूर येथे रुग्णांची संख्या वाढल्याने या गावाची हॉटस्पॉटकडे वाटचाल होत असल्याने ग्रामस्थांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

अणदुर येथे आढळलेल्या 18 रुग्णांपैकी 10 पुरुष व 8 महिला रुग्णांचा समावेश आहे. तर नळदुर्ग येथे आढळलेला रुग्ण 28 वर्षीय महिला आहे. 

दरम्यान, शनिवारी अणदूर येथील 16 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याचे समजल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधले असता रुग्ण घरी सोडल्याचे खरे आहे. मात्र याबाबत सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल, असे सांगितले.
 
Top