उस्मानाबाद, दि. 06 : covid-19 च्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी माजी पालकमंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे 3 ॲम्बुलन्स देण्यात आल्या.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे उपस्थित होते.