मुरुम, दि. ६ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. गुरूवारी (दि. ६) रोजी निलंगा येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी भेट दिली. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

यावेळी माजी मंत्री मधुकराव चव्हाण, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जि.प.माजी सदस्य दिलीप भालेराव, अँड बादाडे, शिवाजी रेश्मे, सतिष चिक्राळे व निलगेकर कुटुंबातील प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलगेकर, डाॅ.शरद पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर आदि उपस्थित होते.

 
Top