तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

शेकडो वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर आयोध्या नगरीमध्ये श्री राम मंदीराचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.या राम मंदिराच्या भुमीपुजनाच्या निमीत्ताने तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी व उस्मानाबाद तालुक्यातील वाखारवाडी येथे श्री रामाच्या फोटोचे पुजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

     शेकडो वर्षापासुन ज्या ऐतिहासिक क्षणाची पिढ्यान् पिढ्या जनता आतुरतेने वाट पाहत होती तो राममंदीर भुमीपुजनाचा ऐतिहासिक क्षण दि.५ रोजी आयोध्या नगरीमध्ये  उत्साहात पार पडला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत श्री राममंदीराचे भुमीपुजन पार पडले.या भुमीपुजनाचा तुळजापुर तामलवाडी व उस्मानाबाद तालुक्यातील वाखारवाडी याथे  भगवान श्रीरामाच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांना साखर वाटप करून हा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीरामचंद्र प्रभुंच्या नावाचा जयघोषही करण्यात आला.

     याप्रसंगी  भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण, ब्रिक्स मानव अधिकार मिशनचे तालुकाध्यक्ष  सर्जेराव गायकवाड तसेच प्रहार  तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, संभाजी ब्रिगेडचे  निरंजन करंडे, शिवसेना तामलवाडी विभाग प्रसिद्धी प्रमुख कृष्णा घोटकर, सोपान सावंत, श्री सावंत, निलेश चिवरे, श्रद्धा सावंत, आप्पा सरडे,तसेच वाखारवाडीचे माऊली सुरवसे,भाजपा युवा मोर्चाचे सुरज राऊत,अमोल शिंदे,गणेश पवार,कुमार शिंदे आदी  उपस्थितीत होते.
 
Top