उस्मानाबाद,दि.04 : महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम, २०२० प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-१९) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
महाराष्ट्र शासनाने कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असून वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
त्याअर्थी मी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदींनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-१९) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने चे आदेशान्वये निर्देशीत केल्यानुसार संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात खालील परिशिष्ट १ व २ ब मधील मार्गदर्शक सूचना/बाबी लागू राहतील. या आदेशाच्या दिनांकापासून 31 ऑगस्ट 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत लागू राहतील.
परिशिष्ट 1
कोविड १९ चे व्यवस्थापनासंदर्भात राष्ट्रीय सूचना
1.चेहरा झाकणे:- सार्वजनिक ठिकाणी,कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरिकांनी तोंडावर मारक/स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे.
२. सामाजिक अंतराचे पालन- सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी ६ फूट (२ गज की दूरी) अंतर ठेवावे. आस्थापना/दुकाने यांनी एका वेळी ५ पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात/आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत. तसेच ग्राहकांमध्ये शारिरिक अंतर राहील याबाबत दक्षता घेणे आवश्यक राहील.
३. मेळावे:- मोठे सार्वजनिक मेळावे/समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहतील.
विवाहासंबंधीत मेळाव्यांमध्ये/समारंभांमध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही. अंत्यविधीच्या/अंत्ययात्रेच्या कार्यक्रमांमध्ये २० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.
४. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास राज्य शासन/रथानिक प्रशासनाकडून कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
५. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ. तत्सम पदार्थांचे सेवन करण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणांबाबत अधिकच्या सूचना
६. घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम):- शक्य असेल तेथपर्यंत घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) या पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्य आस्थापनांचे ठिकाणी काम/व्यवसायाच्या तासांची सुनियोजितपणे आखणी करणे आवश्यक राहील.
७. तपासणी व स्वच्छता (Screening and hygiene):- सर्व प्रवेश व निर्गमनाचे ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, पुरेशा प्रमाणात हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
८. वारंवार निर्जंतुकीकरण:- कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी संपूर्ण जागा, सार्वजनिक सुविधा आणि मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा उदा. दरवाजाचे हॅण्डल इ. दोन्ही पाळ्यांच्या दरम्यानच्या कालावधीत करावयाच्या स्वच्छतेसह वारंवार निर्जंतुक होतील याबाबत दक्षता घ्यावी.
9. सामाजिक अंतराचे पालन:- कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी कामगारांमध्ये पुरेसे अंतर दोन शिफ्टमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात यावा. तसेच कर्मचा-यांचे दुपारच्या जेवणाचे वेळी इ. ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी.
*परिशिष्ट २*
*उस्मानाबाद जिल्हयात खालील उपक्रमावर प्रतिबंध असणार नाहीत. तसेच शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या प्रतिगंधात्मक आदेशाच्या अनुषंगाने खालील उपक्रम चालु ठेवण्यास परवानगी राहील.
१. सर्व अत्यावश्यक दुकाने/ सेवा नियमित अनुज्ञेय वेळेनुसार सुरु राहतील.
२. जिल्हयाअंतर्गत बस सेवा शारीरीका अंतर ठेवून व निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजनेसह प्रवासी आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने जिल्हांतर्गत बस सेवा सुरु राहील.
३. आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध यापुढेही चालु राहतील.
४. अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर सर्व आस्थापना /बाजारपेठा/ दुकाने सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत चालु राहतील.
५. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स,सिनेमागृहाव्यतिरीक्त सकाळी ०९,०० ते सायंकाळी ०७.०० या वेळेत दिनांक ०५ ऑगस्ट २०२० रोजीपासून सुरु राहतील. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील फुड कोर्ट/रेस्टॉरंटस फक्त त्यांना घरपोच सेवा पुरविण्यासाठी सुरु ठेवता येतील. मात्र कोविड-१९ चा प्रादुर्भाव पसरु नये यासाठीच्या सबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करुन प्रमाणित कार्यपध्दतीचे त्यांनी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
६. महाराष्ट्र शासन आदेश दिनांक २३ जुन २०२० मधील तरतुदीनुसार मोकळया जागेत, लॉन्स, मंगल कार्यालयात, विनावातानुकूलित हॉल मध्ये लग्न समारंभ व मेळावे पार पाडण्याबाबत दक्षता घ्यावी.
७. खुल्या मैदानात सर्व शारीरिक व्यायाम आणि क्रीडा प्रकार करताना सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करणे बंधनकारक राहील.
८. वृत्तपत्रांची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) सुरु राहील.
९. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग क्लासेस इ. संस्था बंद राहतील. तथापी शैक्षणिक संस्था(विद्यापिठ/विद्यालये/महाविद्यालये ) येथील कार्यालये/कर्मचारी यांना प्रत्यक्ष अध्ययनाशिवाय ई-सामुग्री तयार करणे (Development of e-content), उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आणि इतर संशोधन कामकाज करण्यासाठी मुभा असेल.
१०. राज्य शासनाचे आदेश दिनांक २५ जुन २०२० मधील अटी व शर्तीसह केशकर्तनालये /स्पाज, सलून्स,ब्यूटी पार्लर्स चालु ठेवण्यास परवानगी राहील.
११. वैयक्तिक खेळ (संघाशिवाय) उदा. गोल्फ कोर्स, आऊट डोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, आऊट डोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब यासारखे खेळांना शारीरिक अंतर राखणे व निर्जंतुकीकरणाचे नियम पालन करण्याच्या अधीन राहून दिनांक ०५ ऑगस्ट २०२० पासून परवानगी असेल. मात्र जलतरणतलाव सुरु ठेवण्यास परवानगी असणार नाही.
१२. सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना खालीलप्रमाणे प्रवासी अनुज्ञेय राहतील.
1.दुचाकी वाहन १+१ हेल्मेट व तोंडावर मास्क लावून.
2.तीन चाकी वाहन १+२ फक्त अत्यावश्यक कामासाठी.
3.चार चाकी वाहन १+३ फक्त अत्यावश्यक कामासाठी.
वरीलप्रमाणे वाहतुक करताना सर्व प्रवाशांनी मारकचा वापर करणे बंधनकारक आहे.
१३. वरील अ.क्रं. १ ते १२ मधील बाबीशिवाय यापुर्वी विशेष / सर्वसाधारण आदेशाव्दारे परवानगी देण्यात आलेल्या बाबी अनुज्ञेय असतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदर आदेश दिनांक ०३ ऑगस्ट २०२० रोजी ००.०० वा. पासून लागू करण्यात येत आहे.