तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा संपुर्ण भारताचे श्रद्धास्थान असलेल्या छञपती शिवाजी महाराज यांच्या "जय भवानी, जय शिवाजी" या घोषणेबद्दल राज्यसभेत सभापती व्यंकया नायडू यांनी खासदार शपथविधी सोहळ्या दरम्यान आक्षेप घेतल्या बद्दल शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या असल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या नेतृत्वाखाली येथील तुळजापुर तालुका युवक रा.काँ. व रा.काँ. विद्यार्थी संघटनेच्या वतीने मंगळवार दि. ४ ऑगष्ट रोजी उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती व्यंकया नायडू यांना "जय भवानी, जय शिवाजी" असे लिहिलेले १००१ पञे येथील डाक घरामधुन पाठविण्यात आले.
यावेळी रा.काँ. युवक चे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, गोकुळ शिंदे, जिल्हा रा.काँ. युवक चे उपाध्यक्ष सचिन कदम, रा.काँ.युवक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके, शहर अध्यक्ष शरद जगदाळे, व्यापार उद्योग तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, अमर चोपदार, रोहीत चव्हाण, विवेक शिंदे, संदीप गंगणे, तौफीक शेख, गणेश नन्नवरे, फिरोज पठाण मनोज माडजे, आण्णासाहेब क्षिरसागर, समर्थ पैलवान आदीसह रा.काँ.युवक व विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.