काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद सदस्य राजकुमार केशवराव पाटील यांच्यावतीने सावरगाव येथील इयत्ता दहावीमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार रोजी संपन्न झाला.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तनुजा बाबुराव ठेले, वैष्णवी काशिनाथ डोके, करुणा गणपत गवळी, वैशाली तायाप्पा छबिले, उषा राजेंद्र नकाते , नेहा नेताजी मगर , आकांक्षा विकास गवळी , स्नेहा हनुमंत माळी , वैष्णवी विश्वनाथ राऊत , गायत्री काशिनाथ राऊत , समर्थ सुग्रीव गाटे व एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये स्कॉलरशिप मिळवणारे विद्यार्थी पूजा काशिनाथ डोके , अश्विनी दत्तात्रय ठेले , संस्कृती सतीश महामुनी , अनिता राजेंद्र कुंभार , श्याम किशोर धडके , दत्तात्रय सुनील माळी , समर्थ हनुमंत मोहरे , संतोष बाबुराव ठेले आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन राजकुमार केशवराव पाटील यांनी केली होते. तर अध्यक्ष म्हणून सोलापूर येथे कार्यरत असलेल्या विक्रीकर अधिकारी सौ. रोहिणी शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुवर्णाताई राजकुमार पाटील , वैष्णवी नानासाहेब पाटील , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामराजे पाटील, श्रीधर आप्पा पाटील, तसेच पाटील परिवार व राजकुमार पाटील मित्रपरिवार तर सत्कार मूर्तींचे पालक उपस्थित होते.