नळदुर्ग, दि. 04 : विवाहितेस मुलबाळ होत नसल्याने व माहेरून पैसे अणत नसल्याच्या कारनावरून सासरच्यानी गेल्या तीन वर्षापासुन वेळोवेळी शारिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पिडीत महिलेने पोलिसात दिल्यावरून पती, सासरा सासु यासह सासरकडील सातजणाविरूध्द  नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

आशा रवी राठोड, रा. आलीबाद (तांडा), नळदुर्ग, ता. तुळजापूर असे तक्रार देणा-या विवाहित महिलेचे नाव आहे. तर रवी बाबु राठोड (पती) , विमल राठोड (सासु)  ,बाबु राठोड (सासरा)  ,सुरेश राडोड (दीर)  ,सुदेश राठोड (दीर) ,सुभाष राठोड (दीर) ,ललीता व संगीता (दोघी जावा) सर्व राहणार  सरदारनगर तांडा, कदेर, ता. उमरगा  असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नावे  आहेत.या सर्वांनी आशा हिचा सन- 2017 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला.. अशा मजकुराच्या आशा राठोड यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा  नोंदवला आहे.

 
Top