लोहारा: शेततळे, विहीरी येथील विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीतील 1)गणेश बन्सी जाधव 2)सचिन वामन राठोड 3)अशोक धनसिंग राठोड 4)भाऊसाहेब रावसाहेब जाधव, सर्व रा. आनंदनगर तांडा, मौजे खेड, ता. लोहारा यांना काल दि. 08.08.2020 रोजी लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले.
तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 8 विद्युतपंप जप्त केले आहेत. त्या पैकी एक पंप हा लोहारा पो.ठा. गु.र. क्र. 155/2020 नुसार चोरीस गेलेला होता. तसेच उर्वरीत 7 विद्युतपंप हे ताब्यात असल्याबाबत वरील चौघे संशयीत हे पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ते पंप चोरीचे असल्याचा पोलीसांना दाट संशय असुन पोलीस पथक त्या विद्युतपंपांबाबत अधिक तपास करत आहे.
