नळदुर्ग :- नळदुर्ग शहर व अणदूर गाव असे मिळून दोन्ही ठिकाणी शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी 9 कोरोना रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले होते. तर 31 जुलै रोजी  नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत  एकाच दिवसात तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळुन आले होते. यामध्ये अणदूर ता. तुळजापूर येथे शुक्रवार रोजी 11, जळकोट 6, नळदुर्ग येथे 3, किलज व सलगरा येथे प्रत्येकी 1 असे एकूण 22 पॉजिटिव्ह रुग्ण आढळले होते. 

तर दुस-या दिवशी शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी नळदुर्ग व अणदूर येथे आणखी 9 रुग्णांची भर पडली आहे. यापैकी नळदुर्ग येथील रुग्णांमध्ये 2 पुरुष व एका चार वर्षाच्या मुलीसह तीन महिलेचा समोवश आहे. तर अणदूर येथील रुग्णांमध्ये 3 महिलेचा समावेश आहे.

विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या सोलापूरसह इतर ठिकाणी ये-जा केल्यानंतर जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नळदुर्ग परिसरातील अणदुर व जळकोट याठिकाणी  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  दि. 1 ऑगस्ट रोजी नळदुर्ग व अणदूर या ठिकाणी 9 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्ण वाढीचा आलेख ग्रामीण भागात वाढत चालल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा आणखी मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव थांबविण्यासाठी तात्काळ कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडणे आज घडीला अतिशय महत्वाचे आहे. कारण ही साखळी अशीच चालु राहिली तर रुग्णांना दवाखाने कमी पडतील अशी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता नागरीकांनीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काम नसताना विनाकारण न फिरता घरात राहणे हेच आता यावर उपाय  असून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर व शासनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. 

 
Top