ताज्या घडामोडी


नळदुर्ग : सुहास येडगे 

राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून येथील शहर भाजपाच्या वतीने बसस्थानकावर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करुन सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नळदुर्ग, अणदुर व जळकोट येथील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या कोरोनाच्या काळात शेतकरी अर्थीक अडचणीत सापडला आहे, शेतकऱ्यांचा जोडव्यवसाय असणारा दुग्धव्यवसाय आडचणीत आहे, सध्या दुधाला शासनाकडून योग्य दर दिला जात नाही, त्यामुळे राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाही शासनाकडून दुधाची खरेदी ही किरकोळ भावात केली जात आहे. त्यामुळे गायीच्या दुधास सरसकट प्रति लिटर १० रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान शासनाकडून देण्यात यावा प्रतिलिटर दुधास ३० रुपये भाव करण्यात यावा अशी मागणी या आंदोलना दरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्याकडून निवेदनात करण्यात आली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर आंदोनल करुन नळदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राउत यांच्याकडे हे निवेदन भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आले. 

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर तुकाराम घोडके, नगरसेवक नय्यर जहागिरदार, ॲन्ड दिपक आलुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, सुशांत भुमकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमीक पोतदार, अरविंद पाटील, ॲन्ड द.का. जाधव, मधुकर नागप्पा सुतार, धिमाजी घुगे, दत्ता राजमाने, सुरज गुडडे, सागर हजारे, विशाल डुकरे, एस के गायकवाड, किरण दुस्सा, सुनिल चौधरी आदीसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
 
Top