तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

तुळजापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापुर येथे दि. १ ऑगस्ट शनिवार रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधुन व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून या दोन्ही थोर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी या दोन्ही महापुरुषांचे प्रतिमा पुजन प्रमुख मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी रा.काँ. चे गोकुळ शिंदे, धैर्यशील, बबन गावडे, संदीप गंगणे, अच्युत वाघमारे, रा.काँ चे युवक चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष शरद जगदाळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पेंदे, शशीकांत नवले, गणेश नन्नवरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top