काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील  भिमनगर मधील सांस्कृतिक  सभागृहात लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 वी  जयंती कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन दलित मित्र नंदु बनसोडे व गौतम बनसोडे यांच्या हस्ते  करून साधेपणाने साजरी करण्यात आली. 

यावेळी ताई सुरते व अनुसया बनसोडे यांनी पाळणा गीतातून आणि दलित मित्र नंदू बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रावण वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावीत प्रथम श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी  दलित मित्र नंदू बनसोडे, गौतम  बनसोडे, राहुल क्षिरसागर, श्रावण वाघमारे, सागर क्षिरसागर, किरण चव्हाण, कवि आबा काळे, राम क्षिरसागर,अच्युत कठारे, सोहम बनसोडे, ताई सुरते, अनुसया बनसोडे आदीजण उपस्थित होते.
 
Top