नळदुर्ग, दि. १ : इयत्ता दहावीच्या परीक्षेत  हुतात्मा बाबुराव बोरगावकर माध्यमिक शाळा साखर कारखाना साईट नळदुर्ग या शाळेची विद्यार्थिनी कु. अंजली अमोल नरवडे ही ९६.८० टक्के गुण घेऊन नळदुर्ग केंद्रात प्रथम आली आहे. तिच्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामप्पा खजुरे, संस्थेचे अध्यक्ष आदित्य बोरगांवकर, सचिव सुनिल चव्हाण, मुख्याध्यापक विकास मोरे, शिक्षक राजकुमार नरवडे, रविंद्र भोसले, गुरव, कोरे, दासकर आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top