उमरगा : येथील अशीत कांबळे यांनी नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याने उमरगा येथील  भिमाईपुत्र प्रतिष्ठान वतीने बुधवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. एकुरगा येथील अशीत कांबळे यांची जिल्हाधिकारी( IAS) पदी निवड झाल्याबद्दल भिमाईपुत्र प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आले.

भिमाईपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ढवळे, उपाध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिन कांबळे, आशित सूर्यवंशी, वंचितचे प्रवक्ते रामभाऊ गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ गायकवाड यांनी केले. तर आभार किरण ढवळे यांनी मानले.


 
Top