नळदुर्ग, दि. १४ : दिवसेंदिवस शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी व सुरक्षेसाठी सर्व व्यापा-याची कोरोना चाचणी दि. १५ ते १६ ऑगस्ट या कालावधीत करण्याचे ठरविले आहे. चाचणी न करणा-यान व्यवसाय करता येणार नाही,  यासंदर्भात शहरातील सर्व व्यापा-याना नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यानी लेखी पत्र दिले आहे.  

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे  यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत चालल्याने प्रतिबंधक उपाय म्हणुन ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत नळदुर्ग शहरातील सर्व व्यापारी बांधवाचे व दुकानातील कर्मचा-यांचे स्वॅब अथवा ॲन्टीजेन चाचणी करण्यात येणार आहे.दरम्यान व्यापारी व कर्मचा-यांना चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणी न करणा-यांना दुकान उघडण्याची परवानगी रहाणार नाही.असे आदेश नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी बजावले आहे.

नळदुर्ग येथिल तुळजापूर रोडलगत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह याठिकाणी दि.15 व 16 ऑगस्ट , शनिवार,रविवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजण्याच्या वेळेत व्यापा-यानी कोरोना चाचणी करून घ्यावयाची आहे.

 
Top