लोहारा, दि. 13 : लोहारा नगरपंचायतच्या वतीने स्थानिक दलितोत्तर विकास निधी अंतर्गत प्रभाग क्र ६, ७, ८, १७ मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करुन करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.

 लोहारा शहरातील अनेक भागात रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. पावसाळ्यात तर रस्त्याने चालणेही मुश्किल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक, न.पं. प्रशासन व नागरिकांनी अश्या भागातील सिमेंट रस्ते तयार करावेत अशी मागणी व पाठ पुरावा शासन दरबारी केली होती.  त्यानुसार शहरातील प्रभाग क्रमांक ६, ७, ८ व १७ मध्ये स्थानिक दलितोत्तर विकास निधी मधून अंदाजे ६ कोटी ६३ लाख रुपये च्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली असुन या सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अबुलवफा कादरी, शाम नारायणकर, बाळासाहेब कोरे, शंकर जट्टे, डाँ.चंद्रशेखर हंगरगे, श्रीकांत भरारे,अमोल बिराजदार, आयुब शेख, सुधीर घोडके, महेश वाले, मल्लिकार्जुन पाटील, मल्लीनाथ घोंगडे, गणेश कमलापुरे, नितीन वाघ, काका घोडके, दत्ता वाघ, सुकाजी सातपुते दिनेश माळी, राजेंद्र घोडके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


 
Top