बार्शी, दि. 13 : तालुक्यातील गाताचीवाडी येथे इनरव्हील क्लब ऑफ बार्शीच्या वतीने  50 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. rlsp जागतिक महामारी करोना प्रतिबंधासाठी अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप सर्व गावकऱ्यांसाठी करण्यात आले. तसेच covid-19 साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी यावर डॉक्टर शमा बकाल यांनी मार्गदर्शन केले. 

त्याचबरोबर दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा सौ. हेमा कांकरिया सेक्रेटरी, सौ. गुंजन जैन, गावचे सरपंच गहिनीनाथ गात, पोलीस पाटील सौ. शितल घाडगे, अंगणवाडी शिक्षिका आशाबाई गात, मल्हारी गूळमकर आदीजण उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख म्हणून स्मिता कांकरिया यांनी कार्य पाहिले. तर सौ. गौरी रसाळ, सौ. शिल्पा सरवदे व सौ. मोना गुंदेचा यांचे सहकार्य लाभले.


 
Top