इटकळ, दि. २१ : संसर्गजन्य कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता गांव पातळीवर विशेष व उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक व्हावे व त्यांना आणखी काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने इटकळ ता. तुळजापूर येथील सुपुत्र जे सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर रफिक मुजावर व त्यांचे बंधु फिरोज मुजावर यांनी इटकळ गांव पातळीवर कोरोना महामारीत काम करणाऱ्या समाज सेवकाचा पुष्प गुच्छ, अर्सेनिक गोळ्या व भेट वस्तू देवून गौरव केला. 

गाव पातळीवर कोरोना महामारीत निरपेक्ष पणे व जागरूक राहून काम करणारे  इटकळ ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळेतील शिक्षक, आरोग्य केंद्रातील परिचारिका, अशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, पत्रकार यांचा सन्मान केला. 

 
Top