नळदुर्ग, दि. 21 : अणदूर ता. तुळजापूर येथील श्री श्री गुरुकुल रविशंकर विद्यामंदिरात इयत्ता आठवीच्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी नागेश दत्तात्रय पांचाळ यांने गणपतीची इकोफ्रेंडली गणपती स्वतःच्या हाताने घरीच तयार करून कोरोना काळात समाजोपयोगी संदेश दिला आहे. 

उदया शनिवार रोजीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षी जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात व अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरवर्षी अणदूर ता. तुळजापूर येथील श्री श्री गुरुकुल व रविशंकर विद्यामंदीर या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली गणपती स्वत: कसे करावे, याबाबतचे धडे दिले जातात. यावर्षी कोरोनामध्ये शाळा बंद आहे. मात्र या शाळेच्या आठवी मधील विद्यार्थी नागेश पांचाळे याने स्वत: घरी इकोफ्रेंडली गणपती तयार केला आहे. कोरोना महामारीच्या या संकटात या विद्यार्थ्यांने एक आगळावेगळा समाजोपयोगी संदेश दिला आहे.


 
Top