ढोकी, दि. 21 : राग मनात धरुन त्याचा बदला घेण्याकरीता सहा जणांनी मिळून एकाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथे घडली आहे. याबाबत सहा जणांनी विरुध्द ढोकी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,  1) पांडुरंग छागन वाकुरे 2) बालाजी छगन वाकुरे 3) पोपट छगन वाकुरे 4) योगेश अरुण वाकुरे 5) समाधान हरिभाउ वाकुरे 6) अंकुश इंद्रजित बुकन, सर्व रा. बुकनवाडी, ता. उस्मानाबाद या सहा जणांचा गावकरी- सुरेश अरुण काळे, वय 20 वर्षे यावर गावातील एका संघर्षाने राग होता. त्याचा बदला घेण्याकरीता नमुद सर्वांनी दि. 19.08.2020 रोजी 13.00 वा. सु. सुरेश काळे यास गावातील लोहमार्गा जवळील गायराण शेतात नेउन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दोरीने गळा आवळुन त्याचा खुन केला. तसेच त्याच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी त्याच्या प्रेतास गळफास लावून लिंबाच्या झाडास लटकवले.

अशा मजकुराच्या रुक्मीण अरुण काळे (मयताची आई) यांनी दि. 20.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम बखरेवरुन नमूद सहा व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 201, 143, 147, 149, 323 सह म.पो.का. कलम- 135 सह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top