मुरुम, दि. १४ : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून  शहरात एकूण रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी कोरोनाविषयी भिती न बाळगता कोणत्याही व्यक्तीला याची लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून काळजी घेऊन आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे. 


बुधवारी रात्री उशीरा दोन व्यक्तीचे स्वॅब अहवाल उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथून आलेल्या दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या असून त्यापैकी एक व्यक्ती यशवंत नगर मधील असून त्यांच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार तर दुसरा रुग्ण हनुमान चौक येथील असून त्यांच्यावर लोहारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हनुमान चौक येथील  पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ३ व्यक्तीचे अहवाल ग्रामीण रुग्णालयातून पॉझिटिव्ह आले आहेत. गांधी चौक येथील रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दि. १२ रोजी ग्रामीण रुग्णालय, मुरूम येथून झुरळे गल्लीतील ६ व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल दि.१३ रोजी रात्री उशीरा प्राप्त झाले असून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. आज शहरात एकूण १२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर आज ०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून या अगोदर ४१ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालयात १७ रुग्णांवर उपचार सुरु असून ६ रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजित डुकरे यांनी सांगितले.

 
Top