उमरगा, दि. 14 : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिना निमित्त उमरगा येथे काँग्रेस कमिटीकडुन आदरांजली अर्पण करण्यात आली. 

उमरगा तालुका काँग्रेस कमीटीच्या वतीने माजी जि.प. सदस्य दिलीप भालेराव यांच्या हस्ते उमरगा येथील काँग्रेस भवनात पुष्पहार अर्पण करुन स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले.

या वेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, नगरसेवक अतीक मुन्सी, दादासाहेब गायकवाड, महेश पाटील, युनुस शेख, खालीक शेख, बाबा औटी, सदाशिव पाटील, बालाजी पाटील, दुष्यंत पाटील आदीजण उपस्थित होते.


 
Top