जळकोट, दि. १४ : मेघराज किलजे
शालेय शिक्षणानंतर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत जळकोट ता. तुळजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी व्यक्त केले.
जळकोट येथील समर्थ क्लासेस च्या वतीने दहावीतील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातपुते हे बोलत होते.
समर्थ क्लासेस च्या वतीने दहावीतील यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी जोड केंद्रात प्रथम आलेली कु. प्रगती कदम, जळकोट केंद्रात तृतीय आलेली कु. ज्योती चंदे,कु. वैष्णवी कदम,कु. साक्षी मजगे,कु. ऋतुजा हासुरे,कु. खुशनुमा बागवान,कु. प्रणिता कामगौडा, कु. आरती चव्हाण,कु. आकाश सगर,कु. अजय भोसले,कु. किरण बिराजदार व कु.श्वेता पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर येथील स्व. बाळासाहेब आगळे पाटील सेवाभावी संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार मेघराज किलजे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ ,कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, सामाजिक कार्यकर्ते सतीश माळी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ क्लासचे संचालक रामशेट्टी पाटील यांनी केले. या कार्यक्रमास संजय कदम, पिंटू कदम, खंडू चंदे , पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. राजलक्ष्मी किलजे व कु. गौरी टॊपे यांनी केले.