उमरगा, दि. 14 : उमरगा येथे उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत मिनाक्षी मंगल कार्यालय येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून याचे उद्धाटन उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंकरराव गडाख -पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख  तथा आ. कैलास पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, मोहन पनुरे, कोथळी सरपंच आप्पासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जि.प.आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, तहसीलदार संजय पवार, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, पो.नि.गजानन घाडगे, डॉक्टर्स वर्ग प्रशासनाचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आदी उपस्थित होते.


 
Top