बार्शी, दि. 14 : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सत्यजित तांबे-पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.जीवनदत्त आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी युवक काँग्रेसच्या वतीने भाजप अध्यक्ष यांच्या राहत्या घरासमोर"कहां गए वो 20 लाख करोड " असा जाब विचारत आंदोलन करण्यात आले.

यावेळी बार्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के,सोलापूर जिल्हा प्रभारी शाहूराजे जगताप,सेवादल यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ.विजय साळुंके महिला काँग्रेसच्या ऍड. निवेदिता आरगडे,समाधान नलवडे, अखिलेश नलवडे, विनोद साळुंके,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

देशभरात कोरोना महामारीच्यामुळे देशात लोकडाऊन करण्यात आला होता  व लोकडाऊन मुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. गरीब,मध्यमवर्गीय नागरिक व लघु व मध्यम उदयोग क्षेत्रातील  उद्योजकानां व या सर्वांसाठी आर्थिक पॅकेजची मागणी सगळीकडून येत होती.म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातील उद्योजकानां होतकरू लोकांना 12 मे 2020 रोजी वीस लाख करोड रुपयांची आर्थिक मदतीचे घोषणा केली.

परंतु प्रत्यक्षात आजतागायत कसलेही व कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या आर्थिक मदतीची मदत सर्वसमान्यपर्यन्त मिळाली नाही किव्हा अशी कोणतीही शासकीय यंत्रणा काम करत नसल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने भाजपा पदाधिकारी यांच्या घरासमोर आंदोलन करीत प्रश्न विचारण्यात आले.


 
Top