बार्शी, दि. 14 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दुध उत्पादक शेतकर्यांच्या वतीने दुध दरवाढ मागणीचे पत्र (पोस्ट कार्ड) पाठविण्यात आलेल्या आंदोलनाची भाजपा बार्शी येथून सुरूवात करण्यात आली.
दुध उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळावा म्हणून भाजपा व मित्र पक्षाच्यावतीने 20 जुलै व 1 ऑगस्ट रोजी दुध दरवाढ व दुध भुकटीला अनुदान मिळावे याकरिता आंदोलने केली. परंतु महाराष्ट्राच्या दुध उत्पादक शेतकर्यांना आजपर्यंत आघाडी सरकारने आजपर्यंत कोणताही न्याय दिला नाही व त्याची दखलही घेतली नाही. अशा परिस्थितीत शेतकरी उध्वस्त होत चालला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या दुधाला भाव मिळावा म्हणून भाजपा व मित्र पक्षाच्यावतीने तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन तिव्र करून आघाडी सरकारला जाग येण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना पत्र (पोस्ट कार्ड), ई-मेल, ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप इत्यादी माध्यमांतून दुध दरवाढ मागणी, दुध भुकटी अनुदान मागणी, निवेदने पाठविण्यात येणार आहेत.
आज बार्शीतील दुध उत्पादक शेतकरी जनक टेकाळे यांच्या गायीच्या गोठ्यात जावून आमदार राजेंद्र राऊत व भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत मा. मुख्यमंत्री यांना दुध दरवाढ मागणीचे पत्र लिहून ते पोस्टाद्वारे पाठविण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बार्शी तालुक्यातून दुध उत्पादक शेतकरी व भाजपाच्या वतीने मा मुख्यमंत्री यांना हजारोंच्या संख्येने पत्रे पाठवून, आघाडी सरकारला जागे करून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून वेळोवेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने करण्यात येणार असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
यावेळी श्रीकांत देशमुख म्हणाले की, श्री भगवंताचा आशिर्वाद घेऊन हे आंदोलन बार्शी तालुक्यातून सुरू करण्यात आले असून, भगवंतच्या आशिर्वादाने आमच्या आंदोलनास नक्की यश मिळून शेतकरी बांधवांना न्याय मिळेल.
यावेळी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, पक्षनेते विजय नाना राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, जि. प. सदस्य व भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम, पं.स. सदस्य अविनाश मांजरे, उमेश बारंगुळे, समाधान डोईफोडे, नगरसेवक विजय चव्हाण, मदनलाल गव्हाणे, काकासाहेब फुरडे, कयूम पटेल, नागजी दुधाळ, भैया बारंगुळे, महेश जगताप, रितेश वाघमारे रमाकांत सुर्वे, रोहीत लाकाळ, संदेश काकडे, राजाभाऊ पोफळे, इमरान मुल्ला, धनंजय जाधव, मेजर मोरे, बाळासाहेब गव्हाणे, भोला अडसूळ, नागजी कातुरे, विशाल बागल, संदिप नागणे, संभाजी राऊत, प्रशांत खराडे, सोनू पवार, युवराज ढगे, दिपक ढावारे, पिंटू यादव, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.