तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर येथे उभारण्यात येणा-या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संकल्प चित्राचे अनावरण सोहळ्याचे प्रकाशन तुळजापुर नगरपरिषदच्या वतीने दि.१४ शुक्रवार रोजी न.प.कार्यालयात करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे म्हणाले की, येथील शिवाजी चौकात असलेल्या छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम बरेच दिवस झाले बंद आहे. अनेक शिवभक्तांमधुन व नागरीकां मधुन नाराजी व्यक्त केली जात होती. छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबतीत न.प.प्रशासन ला सुद्धा खंत वाटत होती. अनेकांच्या भावना दुखावत असल्यामुळे न.प.प्रशासना मार्फत आम्ही पाठपुरावा करुन छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी मुळ जागा उपलब्ध आहे त्याच जागी पुतळा उभारण्याचा संकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात दररोज हजारोच्या संख्येने श्री देवी भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडावी, अशा उद्दात हेतुने तज्ञाचा सल्ला घेऊन आर्केटीक मार्फत हा भव्य दिव्य छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण करुन आश्वारुढ पुतळा लवकरात लवकर उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. या आश्वारुढ छञपती शिवाजी महाराज पुतळ्याची उंची साडेपाच फुट ते सहा मिटर असणार आहे. अडीच ते तीन फुट वाँल कंपाऊंड असणार आहे.

विशेष म्हणजे या अश्वारुढ पुतळ्याच्या परिसरात मावळ्यांच्या प्रतिकात्मक स्वरुपात आकर्षक पुतळे उभारण्यात येणार आहेत. हा छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शहराच्या सौदंर्यात नक्की भर पाडणार आहे. तरी शहरातील शिव प्रेमीनी व नागरीकांनी न.प.प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले आहे. तसेच छञपती शिवाजी चौक ते भवानी रोड,ते शुक्रवार पेठ पर्यंत शहरात विद्युत लाईटची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत माऊजीनाथ महाराज, नगरसेवक अमर मगर,  चंद्रकात कने, विशाल रोचकरी, नानासाहेब लोंढे, आनंद कंदले, जनहित संघटनेचे अजय सांळुके, छावाचे जिवन इंगळे, चैतन्य शिंदे आदीसह शिवभक्त उपस्थित होते.


 
Top