इटकळ, दि. 14 : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुरुषाच्या संपर्कातील चार जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे दरम्यान, एका संशयित महिलेचा दि. 13 रोजी मृत्यू झाला.
५५ वर्षीय महिलेला गुरुवारी दुपारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने अणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल हलविण्यात आले.उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आलेल्या पुरुषाचा चार दिवसा पुर्वी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पत्नी .एक मुलगा व दोन लहान मुलांचा असे एकूण चार जणांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. तीन दिवसाचा जनता कर्फ्युला पुन्हा वाढविला आहे