इटकळ, दि. 14 : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील बाभळगाव (ता. तुळजापूर) शिवारातील केरुर पुलावरुन साखरेचा ट्रक तलावातील पाण्यात पडल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. मयत हे सोलापूर येथील रहिवाशी आहेत.
सरफराज इन्युस शेख (वय 24 वर्षे) व महादेव भिसापती रासकोंडा (वय 40 वर्षे, रा. विडी घरकुल सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर येथून २५ टन साखर भरुन हैद्राबाद कडे निघालेला ट्रक एम एच १३ सीव्हील ५५४७ हा राष्ट्रीय महामार्गावरील बाभळगाव ता. तुळजापूर तलावाच्या पुलावरुन खाली पाण्यात पडला. यामध्ये वरील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सदरील अपघात आठच्या सुमारास घडल्याने अंधारात इटकळ व नळदुर्ग येथील पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या दोघांचा मृतदेह बाहेर काढला. रात्री दहाच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाण्यातचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोटे व मस्के यांनी इटकळ दूरक्षेत्राचे जमादार व्ही आर जाधव, पोलीस एल बी शिंदे, मनमत पवार यांनी स्थानिकांच्या मृतदेह मदतीने बाहेर काढला. याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात शनिवार रोजी रोजी न्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार व्हीआर जाधव हे करीत आहेत.