उस्मानाबाद, दि. 12 : जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून शुक्रवार दि. 14 ऑगस्ट रोजी जिल्हयात सायंकाळी आलेल्या प्राप्त अहवालानुसार 182 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 229 पोहचली वर आहे. यापैकी 1 हजार 628 जण बरे होऊन घरी परतले असून 1 हजार 507 जणांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत जिल्हयात 94 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज पॉजिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 45, तुळजापूर 27, उमरगा 21, कळंब 24, परंडा 34, लोहारा 3, भूम 18, वाशी तालुक्यातील 10 जणांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद येथे एकूण 345 स्वब पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे तसेच जिल्हयातील रॅपिड अॅटिजेन चाचणीचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.