अक्कलकोट : तालुक्यातील सदलापूरच्या महिला महाराष्ट्र चॅम्पियन धरती उर्फ राणी बनसोडे व त्यांच्या संपूर्ण बनसोडे कुटुंबाचा सत्कार सोमवारी दुपारी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,अतिरिक्त अर्जुन गुंडे,अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, अनिल मोटे, स्वाती शटगार, परमेश्वर राऊत, महेश आवताडे, संगिता तांडोरे व वागदरी जि. प. सदस्य अनंद तानवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपटू धरती उर्फ राणी मलेशप्पा बनसोडे व त्यांच्या भावंडांची दंगल सारखी बातमी दैनिक दिव्यमराठीत प्रसिद्ध झाली होती.याची दखल घेऊन देश विदेशातुन मदतीचा ओघ सुरू झाला आहे.यातच जि प सदस्य आनंद तानवडे यांनी जि प समाजकल्याण विभाग सेसफंडातुन विभागाकडे पाठपुरावा करून तीन लाख रूपये कुस्ती आखाडा साठी मंजुर करून घेतले असुन धरती व सावित्री दोन्ही बहिणींना दरमहा दोन हजार असे ४८ हजार रूपयाचा स्काँलरशीप मंजुर करून दिला आहे. सोमवारी दुपारी सोलापूर येथे धरती बनसोडे व कुंटुंबियाचा विशेष सत्कार घडवुन आणला. सत्कार पाहुन बनसोडे कुंटुंबीय भारावुन गेले होते.
सदलापूर येथील कुस्तीपटू धरती बनसोडे इयत्ता दुसरीपासून कुस्तीचे सराव करते.दरवर्षी ग्रामीण भागात यात्रेनिमित्त कुस्त्यांचे फड आयोजित करण्यात येत असतात.त्यात ग्रामीण भागातील अनेक पुरूष पैलवानानही तिने चितपट केले आहे. यात हजारो रुपयांचे बक्षिसे मिळवत असत. त्यावर त्यांची वर्षभर खुराक व गुजराण चालू राहत असे. त्यात कोरोनाने सर्व वाटचालीत अडथळा निर्माण केला .त्यात धरती व त्यांच्या भावंडाना उपासमारीची वेळ आली.धरतीने राज्यस्तरीय कुस्तीत भाग घेऊन ती महाराष्ट्र चॅम्पियन झाली आहे.महाराष्ट्राबाहेर कर्नाटकातही तिचे नाव कुस्तीत प्रसिद्ध आहे.कोरोनामुळे तिच्या खुराकाचा प्रश्न निर्माण झाला.त्यात दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रात दंगल लेख लिहिले.त्याने देश विदेशातून मदत होत आहे.आता पशासनाकडुनच दखल घेतली गेल्याने धरती भारावुन गेली असुन जोमाने कुस्तीच्या सरावाला लागली आहे.
यावेळी धरतीच्या कुंटुंबियासह फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार बाबासाहेब निंबाळकर, पत्रकार योगेश कबाडे, अमोल फुलारी यांच्या उपस्थितीत आज सोलापूर येथील नियोजन कक्षात सत्कार करण्यात आला. जि प सदस्य आनंद तानवडे व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जि प शाळेला मँट साठी जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्याकडे शिफारस केली आहे.यावेळी शीतल मोहिते पाटील यांनी विशेष अभिनंदन केले व अक्कलकोट भेट देणार असल्याचे सांगितले व शुभेच्छा दिल्या व उपस्थित सदस्यांनी बाके वाजवून अभिनंदन केले.संगिता तांडोरे, परमेश्वर राऊत व समाज कल्याण समितीचे सर्व सदस्य यांचे तानवडे यांनी विशेष आभार मानले. चार आँगस्टच्या समितीच्या सभेत मंजुरी दिली होती .सर्व सदस्य उपस्थित होते.