अक्कलकोट, दि. 12 : तालुक्यातील पानमंगरुळ येथील एसटी स्टँड वर रस्त्याच्या बाजूला कडूलिंबाची झाडे आहेत. यापैकी पाच कडूलिंबाची झाडे वाळून गेली आहेत. यांच्या फांद्या व झाड कधी तुटून पडेल याचा काही नेम नाही. मागील सात आठ महिन्यांपासून या झाडांची हिच अवस्था आहे. सध्या लॉकडाऊन मुळे नागरिकांचे बाहेर गावी येणं जाणं बंद असल्याने एसटी स्टँड सुमसाम आहे. नाहीतर आजपर्यंत एखादा अनर्थ घडला असता.
याच झाडाखाली प्रवाशी, मुसाफिर एसटी, खाजगी वाहनांची वाट पाहत तासनतास सावलीत बसत होते. झाड हिरवं असताना गावाची शोभा वाढवत होती. आता तेच झाडे एसटी स्टँड परिसरात अशोभनीय दिसत आहे. वाळल्यानंतर त्यांच्यावरच आता कुड चालवण्याची वेळ आली आहे. ही झाडे पूर्ण पणे वाळून गेली आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याने लवकरच या झाडांना तोडून भविष्यात होणाऱ्या नुकसानापासून नागरिकांना वाचवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.