अक्कलकोट, दि. 12 : अक्कलकोट शहरातील मंजुर रमाई आवास  व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान त्वरित वाटप करण्यात यावे, अशी मागणी रिपाइं (आ) च्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, सध्या पावसाळा सुरू असुन अनेक रमाई आवास व प्रधानमंत्री आवास लाभार्थीनी आपले घरे बांधण्यास काढले आहेत. अश्यात अनुदान वेळेवर न भेटल्याने अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. अशा थकीत पहिला व दुसरा हप्त्याचे अनुदान तात्काळ त्यांचा बँक खातेवर जमा करून त्यांचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यास प्रशासनाने सहकार्य करावे, तसेच योजनेतील नविन मंजूर लाभार्थ्यांचे पहिला हप्ता शासन निर्णया प्रमाणे सव्वा लाख रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावा अन्यथा रिपाई आठवले गटाच्या वतीने नगरपरिषदेस कुलुप ठोको आंदोलन करण्यात येईल अश्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद आशा राऊत यांना देण्यात आले.

याप्रसंगी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, शहर अध्यक्ष प्रसाद माने उपस्थित होते.


 
Top